Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड करणाऱ्या किमया राठोड यांचा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे सत्कार

team by team
January 21, 2022
in शैक्षणिक
0
इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड करणाऱ्या किमया राठोड यांचा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील किमया राठोड वय १३ तरीही तिनं जिद्दीने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे.आणि शहादा तालुक्याचे नाव जिल्हा, राज्य,देश आणि जागतिक पातळीवर वाढविला आहे.त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चु कडू व नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांच्या हस्ते कु.किमया राठोड यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय पातळीवर किमयाने तब्बल ३० मिनिटे १६ सेकंद शीर्षासन करून विक्रम केला . तिने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहेत.शहादा येथील किमया युवराज राठोड या आठवीच्या विद्यार्थिनीने ३० मिनिट १६ सेकंद शीर्षासन तर केलेच,पण शीर्षासनात असताना तिने हनुमान चालिसाचे तोंडपाठ पठणही केले. विक्रमाची नोंद इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. विक्रमाची नोंद झाल्याचे पत्र तिला नुकतेच मिळाले आहे. यासोबत तिला स्मृतिचिन्ह, मेडल व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.कोरोना काळात पूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना कुणीही घराबाहेर निघत नव्हते. त्या काळात तिच्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे तिला योगासनाची आवड निर्माण झाली. सतत चिकाटीने सराव करून विक्रमापर्यंत तिची शीर्षासनाची वेळ निश्चित ३० मिनिटे १६ सेकंद झाली होती. महत्त्वाचे म्हणजे शीर्षासनात हनुमान चालिसाचे पठण करीत याबरोबर तिला योगासन , चित्रकला, हस्ताक्षर,गायन , वक्तृत्व, नृत्य, नाट्यछटा, क्रीडा या स्पर्धांमध्ये आवड असून स्वतः नृत्यदिग्दर्शनसुद्धा करते.किमया ही वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथील क्रीडा संचालक वाय.एस.राठोड यांची मुलगी आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा किमयाचा मानस आहे.तिला वेळोवेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे हैदराबाद येथील मुख्य समन्वयक लॉयन विंगी नरेंद्र गौड, समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुर्रम यांचे मार्गदर्शन लाभले असेही कु.किमया यांचे पालक वाय.एस.राठोड यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 140 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी, पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यास मिळाला 57 कोटी रुपयांचा वाढीव निधी

Next Post

म्हसावद येथे कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही यात्रा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने दिली माहिती

Next Post
म्हसावद येथे कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही   यात्रा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने दिली माहिती

म्हसावद येथे कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही यात्रा रद्द, ग्रामपंचायत प्रशासनाने दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add