तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील लोभाणी येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील इयत्ता १० वीला शिकणारी विद्यार्थिनी करोना पॉझिटिव्ह आली आहे. या विद्यार्थिनींमध्ये तापाची लक्षणे होती त्यामुळे तिचा स्वब घेण्यात आला होता. रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आला असून तिच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रकल्प अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. शिवाय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना कर्मचार्यांना दिली. इतर विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.