नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील कोविड सेंटरला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी भेट देत ट्रामा केयर युनिटची इमारतीची व ऑक्सिजन प्लांन्टची पाहणी केली.
नवापूर तालुक्यात मोठ्या संखेत कोरोना रूग्ण आढळत आहे.त्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचा दौरा होता सकाळी ११ वाजता नवापूर तालुक्यातील भरडु येथे नवापूर तालुका कृषि विभागाचा बांधावरच्या वृक्षलागवडीचे कामाची पाहणी करुन नवापूर शहरात येऊन नवापूर तहसिल कार्यालयात गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी यांना कोविड संदर्भात सुचना देण्यात आल्या त्या नंतर महसुल वसुली उद्दिष्टे करण्यासाठी तलाठी,सर्कल ,मंडळ अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.तसेच कुंटुबसहाय योजना अंतर्गत ५ लाभार्थी यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच नवापूर तालुक्यात अवैध वाळू तस्करी सुरू असून महसूल विभागाचे कर्मचारी कारवाई करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करत कारवाई करण्याचे आदेश दिले. या नंतर नवापूर नगरपालिकेचा जुन्या सिमा तपासनी नाक्या जवळील नेहरु गार्डनची पाहणी करुन सदर गार्डन विकसीत करण्याकामी चर्चा विनीयमय करण्यात आली या सदर्भात निधी उपब्लध करुन लवकरच नेहरु गार्डन विकसीत करण्यात येणार आहे.तसेच नवापूर नगरपालिकेचे टाऊन हॉल येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले त्याची पहाणी केली.यानंतर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत तेथील ट्रामा केयर युनिटची इमारतीची पाहणी करुन ऑक्सिजन प्लांन्टची पाहणी करुन योग्य त्या सुचना डॉक्टारांना दिल्या यावेळी सहायक जिल्हाधिकारी मिनल करणवाल,तहसिलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी,गटविकास अधिकारी सी.के.माळी,न.पा प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,अभियंता संदाशिव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय पाडवी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा वळवी,नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे,डॉ अविनाश मावची माजी नगरसेवक अजय पाटील सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.