नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील जामतलाव येथे वनविभागाने कारवाई करीत ५० हजाराचे ३७ खैर नग जप्त करण्यात आले असुन एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव) यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांचे सह वनसंरक्षक धुळे उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक यांच्या सह जामतलाव येथे राहणार्या सुमन गावित यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या राहत्या घरा जवळील शेटर मध्ये कुर्हाडीने घडतळ केलेले ३७ खैर नग मिळून आले. सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत ५० हजार रुपये आहे. सदर कारवाहीत धुळे वनसंरक्षक दि.वा.पगारे, नंदुरबार उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय ग.पवार, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, शिवाजी रत्नपारखे,वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक यांनी सहभाग भाग घेतला. सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आहवान वनविभागाने केले आहे.








