Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हातधूई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी अधिक्षक निलंबित, मुख्याध्यापकासह इतर तीन शिक्षकांची वेतनवाढ थांबवली

team by team
January 20, 2022
in Uncategorized
0
हातधूई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी अधिक्षक निलंबित, मुख्याध्यापकासह इतर तीन शिक्षकांची वेतनवाढ थांबवली

तळोदा l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील हातधूई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी अधिक्षकास निलंबित करण्यात आले असून मुख्याध्यापकासह इतर तीन शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती तळोदा प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.
धडगाव तालुक्यातील हातधूई येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पालकांनी संतप्त भावना व्यक्त करत जबाबदार कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रकल्प अधिकार्‍यांनी दोषी कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने प्रकल्प अधिकार्‍यांना अहवाल सादर केल्यानंतर प्रकल्प अधिकार्‍यांनी आश्रमशाळेतील अधिक्षक यांना निलंबित केले आहे. तर मुख्याध्यापक व इतर तीन शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. शिक्षकांनी मुलांची व्यवस्थित काळजी घेतली नसल्याचा ठपका ठेवला आहे. मुख्याध्यापकांंनी शाळेतील अधीक्षिका ही गेल्या चार महिन्यांपासून रजेवर असतांना त्याबाबत प्रकल्पास वेळोवेळी कळविले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाने कर्मचार्‍यांवरील केलेल्या कारवाईने आश्रमीय कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
अधीक्षिकाही निलंबित

याआश्रमशाळेतील स्त्री अधीक्षिका यांची केवळ दोन दिवसांची किरकोळ रजा होती. ही रजा संपून त्या शाळेत रुजू होणे अपेक्षित होते. मात्र त्या गेल्या चार महिन्यापासून रजेवरच आहेत. याबाबाबत मुख्याध्यापकांनी नोटीसही दिली होती. तरिही त्या आजतागायत बेकायदेशोर रजेवर असल्याने प्रकल्पाने त्यांना देखील निलंबित केल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.अमरिश पटेल यांनी आज घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात २४ तासात आढळले ४२९ कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्ह्यात २४ तासात आढळले ४२९ कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add