मुंबई l प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अमरिश पटेल यांना सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
विधानभवनात हा शपथविधी समारंभ संपन्न झाला. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.