नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार ते साक्री रस्त्यादरम्यान ठाणेपाडा जवळील नर्सरीनजरीक वाळु घेवून भरधाव वेगात जाणार्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ठाणेपाडयातील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघात घडताच वाळु डंपरचालक पसार झाला असून याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील ठोणपाडा येथे राहणारे अनिल युवराम माळी व संकेत मदन चौधरी हे दोघे मोटारसायकल (क्र.एम.एच.१८- टी. ८६३९) छडवेलकडून ठाणेपाडा गावाकडे येत होते. भरधाव वेगात नंदुरबारकडून साक्रीकडे वाळु घेवून जाणार्या डंपर (क्र.एम.एच.१५-जी.व्ही.८७७९) दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संकेत मदन चौधरी व त्याचा मागे बसलेला अनिल युवराज माळी हे दोघे जागीच ठार झाले. अपघात घडताच डंपरचालक पसार झाला आहे. याबाबत सुनिल युवराज माळी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.े गुन्हा दाखल करण्यात आला आहे.