Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायतीत पराडके बंधूंच्या नेतृत्वावर जनतेने केला शिक्का मोर्तब : शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी

team by team
January 20, 2022
in राजकीय
0
धडगाव नगरपंचायतीत पराडके बंधूंच्या नेतृत्वावर जनतेने केला शिक्का मोर्तब : शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी

अक्कलकुवा l प्रतिनिधी
धडगाव वडफळ्या नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने १३ जागा जिंकून अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या धडगाव नगरपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.पराडके बंधूंच्या नेतृत्वावर जनतेने केला शिक्का मोर्तब केला असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी सांगितले.
निकालानंतर नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख आमश्या पाडवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, धडगाव हि महाराष्ट्र राज्यातील सर्वात अतिदुर्गम भागातील नगरपंचायत असुन सदर निवडणुकीत पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हावर सर्व उमेदवार उभे करण्यात आले होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या मतदारसंघ असतांना शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित व खासदार डॉ.हिना गावित यांनी सुरुवातीपासून निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे शिवसेने समोर मोठे आवाहन होते. परंतु धडगाव शहरातील सुज्ञ मतदारांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत १७ पैकी १३ जागांवर निवडून देत शिवसेना पक्षाला संधी दिली आहे. स्थानिक शिवसेना नेते विजय पराडके व जिल्हा परिषद सभापती शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश पराडके या बंधूंच्या नेतृत्वावर जनतेने शिक्का मोर्तब केल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, ना. अब्दुल सत्तार, धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठपुरावा करून जनतेला दिलेले आश्वासन पुर्ण करणार असून निकालामुळे आदिवासी विकास मंत्री, माजी मंत्री,खासदार यांचे शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असल्याचे नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख आमश्या पाडवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. यावेळी नंदुरबार जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मोठमोठ्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आधिच प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना नेते विजय पराडके व गणेश पराडके यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. अतिदुर्गम भागात शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्यादादा पाडवी यांनी संघटन मजबूत करण्यासाठी अत्यंत मेहनतीने प्रयत्न केल्यामुळे आज विजय पराडके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रस्थापितांना या निवडणुकीत धोबी पछाड दिली आहे. भविष्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा असणार असल्याचे देखील युवा सेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले,, युवा जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, गोलू चंदेल आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वनक्षेत्रात अतिक्रमण केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने सुनावली वनकोठडी

Next Post

ब्रह्माकुमारीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वर्णिम भारताकडे` कार्यक्रमाचे आज उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add