नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्याच्या दुर्गम भागातील बालाघाट, ता. अक्कलकुवा येथील रहिवासी व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हा अखेर द. अमेरिकेतील माऊंट एकांकगुआ शिखर रवाना झाला. त्याला या मोहिमेसाठी आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य अंतर्गत १८ लाख ९० हजार मंजूर करण्यात आले आहेत.
घरची साधारण परिस्थिती असणाऱ्या या गुणवत्ताधारक खेळाडूला या मोहिमेसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. जगातील सर्व सात सर्वोच्च शिखरावर गिर्यारोहण करून जाण्याचा अनिल वसावे यांचा मानस आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कैम्प व द. अमेरिकेतील माऊंट एकांकगुआ शिखर चढाईसाठी करून अनिल वसावे
यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या व आदिवासी विकास विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार याची खात्री वाटते.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त महेंद्र वारभुवन आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील अनिल वसावे हा तरुण 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 22 या दरम्यान एव्हरेस्ट बेस कँपवर जाणार आहे. त्यानंतर दि. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2022 या कालावधीत दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच माऊंट एकांकगुआ हे शिखर सर करण्यासाठी जाणार आहे. या दोन्ही उपक्रमासाठी अनिल वसावे याला मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी विभागाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. गिर्यारोहक श्री. वसावे यांनी आदिवासी विकास विभागाच्या मदतीबद्दल आभार मानून गिर्यारोहणाच्या माध्यमातून देशाचे व राज्याचे नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.