तळोदा l प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपमानजनक व धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून त्वरित अटक करण्याबाबतचे निवेदन भाजपा संघटनेकडून तळोदा पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व वाचाळवीर नाना पटोले यांनी काल भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपमानास्पद असे वक्तव्य करून पंतप्रधान यांचा अपमान करत त्यांना एका प्रकारे धमकी दिली आहे. यावरून कांग्रेसची मोदीजी बद्दलची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते. या वक्तव्यच्या निषेधार्त भाजपा ओबीसी मोर्च्याचे पदाधिकारी यांनी सदर निवेदन दिले असून बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरुद्ध त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. अटक न झाल्यास भाजपा ओबीसी मोर्चातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष योगेश चौधरी, शेतकरी संघटनेचे चिटणीस शाम राजपूत,युवा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, स्वीकृत नगरसेवक हेमलाल मगरे, दिपक चौधरी, युवा शहराध्यक्ष राजू पाडवी, योगेश चव्हाण, पंकज तांबोळी, जीवन अहिरे, संजय माळी, रसीला देसाई, प्रज्ञा कुलकर्णी, वंदना माळी, लकेश माळी आदींजन उपस्थित होते.








