जागेवर विजयी
नंदुरबार l प्रतिनिधी
साक्री नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.
साक्री नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आज मतमोजणी घेण्यात आली यात भाजप 11 जागांवर विजयी, शिवसेना 4 जागांवर विजयी, काँग्रेस 1 जागेवर विजयी, अपक्ष 1 जागेवर विजयी झाले. आज झालेल्या मतमोजणीत खैरनार कल्पना राजेंद्र, अपक्ष(244), भावसार संगिता बाबूलाल, भाजप(400). पवार उषाबाई अनिल, भाजप(499). निकुंभे प्रवीण राजेंद्र, भाजप (388) , देसले मनिषा महेंद्र, भाजप(565), सोनवणे रेखा आबा, भाजप(427), नागरे सोनल सुमित, शिवसेना(296), पवार जयश्री हेमंत, भाजप(404), नागरे सुमित ज्ञानेश्वर, शिवसेना(533), अहिरराव पंकज पंढऱीनाथ, शिवसेना (604), भोसले उज्वला विजय, भाजप (405), पगारिया जयश्री विनोद, भाजप ( 346), भोसले राहुल अरविंद, शिवसेना(464), भोसले राजेंद्र रामराव,भाजप(460), वाघ दिपक दिलीप, भाजप (404), पठाण नरगीसबी याकुबखा, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस(224), गिते बापु पुंडलिक, भाजपा(287) हे उमेदवार विजयी झाले.








