नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार प्रशासनातर्फे रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात मंगळवार रोजी तब्बल 419 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
नंदूरबार जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जिल्ह्यात दि.18 जानेवारी रोजी दिवसभरात 419 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात 178 , तळोदा 29 , शहादा 92, अक्कलकुवा तालुक्यात 26 ,नवापूर तालुक्यात 92, तर बाहेर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात 952 कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण आहेत.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








