नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्य सदस्य पदासाठी शेखर कुवर (वै॑दाणे)यांची निवड करण्यात आली असून ही निवड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे,उपाध्यक्ष पंकज चौधरी, विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील यांच्या शिफारशीनुसार व सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते करण्यात आली आहे.
खान्देश व उत्तर पश्चिम महाराष्ट विभागातील जळगाव,धुळे, नंदुरबार,नाशिक,नगर या जिल्ह्याचा समावेश नाशिक विभागात होतो.अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशन ही संघटना भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त संघटना असून सर्व तळा-गाळातील फार्मसिस्ट बंधू आणि भगिनींचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवायचे कार्य ही संघटना करत असते,
शेखर कुवर यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील ,विभागीय उपाध्यक्ष भैया पाटील , विभागीय सचिव सतिष पाटील, यांनी कौतूक केले आहे.








