नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात दि.17 जानेवारी सोमवार रोजी तब्बल 240 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जिल्ह्यात दि.17 जानेवारी रोजी दिवसभरात 240 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात 99 , तळोदा 25 , शहादा 46, अक्कलकुवा तालुक्यात 2 ,नवापूर तालुक्यात 61, धडगाव तालुक्यात 1 तर बाहेर जिल्ह्यातील 16 जणांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात 789 कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण आहेत.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








