तळोदा | प्रतिनिधी
तळोदा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ यांच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन तळोदा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ यांच्या तर्फे तळोदा मुख्याधिकारी सपना वसावा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ यांच्या वतीने दि.१३ सप्टेंबर २०२१ रोजी तळोदा बसस्थानकावर झालेल्या फलक अनावरण कार्यक्रमात बोलतांना तळोदा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ शाखा तळोदा यांच्या कार्यालयासाठी नगरपालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी दिले होते. त्यानुसार ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखातर्फे ठराव करून सादर करीत आहोत. तरी याबाबत कार्यवाही व्हावी असे निवेदन तळोदा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ यांच्या वतीने देण्यात आले.
निवेदन देतेवेळी ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष प्रा.आर.ओ.मगरे, जिल्हा सदस्य ए.डी.सुर्यवंशी, तळोदा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष राजेश चौधरी, सहसचिव प्रा.आर.व्ही.राणे, उपाध्यक्ष मुश्तफा हुसेन राजा, सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अल्पेश जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.








