म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची १६ रोजी डिजीटल सभासद नोंदणी अभियान या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकिला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी मंत्री अँड पद्माकर वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सिमाताई वळवी, माजी. उपनगराध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा किसान सेल अध्यक्ष, स्वयरोजगार सचिव, जि.प, पं. समिती सदस्य, सरपंच व विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी डिजिटल सदस्य नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आपल्या मनोगतात सदस्य नोंदणी अभियान बदल आपले मनोगत व्यक्त केले. तर जि.प. अध्यक्ष ॲड.सीमाताई वळवी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक यांनी केले तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन शहराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.








