नंदुरबार l प्रतिनिधी
येथील मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शहरातील झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन तिळगुळ वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरीकांच्या चेहर्यावर समाधान व आनंद दिसून आला.
सण म्हटला की सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो. परंतू काही गरीब व गरजू लोकांना आनंद मिळेलच याची शाश्वती नसते. याच अनुषंगाने येथील मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून शहरातील माळीवाडा परिसरातील आदिवासी वस्ती, माळीवाडा भिलाटी, शनी मंदिर, सिद्धार्थ चवौक, मातंग वाडा व चिंचपाडा भिलाटी परिसरात घरोघरी जाऊन प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी तिळगुळ वाटप करुन त्यांच्या समवेत मकरसंंक्रांत सणाचा आनंद घेतला. यावेळी तेथील गरीब व गरजू नागरीक तसेच बालकांच्या चेहर्यावर आनंद बघून पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. तिळगुळ वाटपासाठी मातृवंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र माळी, सचिव जगदीश वंजारी, उपाध्यक्ष राहुल माळी, रोहित जैन, भूषण माळी, रमाकांत माळी, रोहित समुद्रे, हरीष माळी, सचिन माळी, हेमंत माळी, अनिल वळवी, सिद्धार्थ पेंढारकर, सागर वळवी व मातृवंदना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.








