नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सावळदे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी अज्ञाताविरूध्द सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील सावळदा या गावातील १७ वर्ष १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस कायदेशीर रखवालीतून पळविल्याप्रकरणी फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द सारंगखेडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील राजेश शिरसाठ करीत आहेत.