नंदुरबार l प्रतिनिधी
कोविडमुळे नंदुरबार जिल्ह्यातील 19 वर्षीय मुलीचा आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास मृत्यु झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार शहरातील 19 वर्षीय मुलीची आरटीपीसीआर चाचणी सुरत येथे 6 जानेवारी तर नंदूरबार येथे 12 जानेवारी रोजी करण्यात आली होती.त्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. तिला नंदूरबार येथील स्मिथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.दरम्यान कोविड 19 सह कावीळमुळे यकृत निकामी झाल्याने तिचा आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास नंदूरबार येथील स्मिथ हॉस्पिटल येथे मृत्यु झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.








