नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथे तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय सेना दिवसाचे औचित्य साधून 138 गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले
नवापूर मतदारसंघांचे आमदार शिरिषकुमार नाईक व नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलिप नाईक याचा आदेशानुसार नवापुर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे भारतीय सेना दिवसाचे औचित्य साधून नवापूर शहरातील गरजू गोरगरीब तसेच फूटपाथवर राहणाऱ्या अबालवृद्धांना सध्याच्या थंडीच्या कडाक्यात पासून बचाव करण्यासाठी मायेची उब मिळावी यासाठी काँग्रेस भवन येथे 138 जणांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी नवापुर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष जालमसिंग गावित, संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष दामू बिऱ्हाडे , माजी उपनगराध्यक्ष व नवापूर शहर काँग्रेस चे अध्यक्ष सोहेल बलेसरिया, रहमत खा पठाण, फैजल शेख, असद कुरेशी हर्षल गावित, जगदीश पाटील,संजू मोरे, तुराब पठाण , धनसुख जोशी, नाझिम शेख, सदानंद गावित ( एक्स जॉइंट सेक्रेटरी – मंत्रालय मुंबई ), मोहम्मद जी मुल्ला, प्रभाकर गावित, ताहीर पठाण आदी कार्यकर्ता उपस्थित होते.








