नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथे युवकाचा विजेच्या खांबवर चढून मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ व ऑपरेटर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अमळथे ता.नंदुरबार येथे वायरमनच्या सांगण्यावरून विद्युत खांबवर चढलेल्या पंकज गिरासे याचा शॉक लागून मृत्यू झाला. या प्रकरणाला जबाबदार वरिष्ठ तंत्रज्ञ शरद जाधव व ऑपरेटर ललित चांदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोघांना निलंबित करण्याची कारवाई केली.








