नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील नळगव्हाण येथील वाल्हेरी नदीच्या पात्रातून गौणखनीज पथकावर वाळु माफियांनी ट्रँक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन दमदाटी व शिवीगाळ केलेल्या घडली घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १३ दुपारी 12 वाजेच्या सुमारास नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गवरील नळगव्हाण व कुकरमुंडा फाट्याजवळ वाल्हेरी नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्यातून वाळू तस्कशी होत असल्याचे माहिती मिळताच मंडळाधिकारी सी. एम. सलगर, राजविहिरचे तलाठी प्रदीप वसावे, नळगव्हाणच्या तलाठी वैशाली कांबळे, शिर्वेच्या तलाठी प्रमिला नाईक, कोतवाल बिपीन वसावे, भुपेंद्र पाडवी,भूपेंद्र पाडवी, या गौणखनीज पथकाने तेथे धाव घेतली. महसूल विभागाच्या पथकाने अवैधरीत्या वाळू उत्खनन करताना रॉयल्टी व इतर बाबींची विचारणा केली. यामुळे संबंधित ट्रॅक्टर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू खाली केली. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी ट्रॅक्टर हल्ल्यातून स्वतःचा बचाव केला. ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून ट्रॅक्टर पळवून नेले. यामुळे महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग करून गुजरात राज्यातील डोडवा येथे पकडले. मात्र ट्रॅक्टरचा चालक फरार झाला आहे. याबाबत तहसीलदार गिरीश वखारे यांच्याशी संपर्क केला असता याप्रकरणी आज दि.१४ गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती दिली.








