नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दि.13 जानेवारी रोजी तालुक्यात तब्बल 95 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्हयात आज दि.13 जानेवारी रोजी दिवसभरात 95 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात 42 ,नवापूर तालुक्यात 23 , तळोदा 11 , शहादा 13, अक्कलकुवा येथील दोन तर नवापूर येथील एकाचा समावेश आहे.सध्या नंदूरबार जिल्ह्यात सध्या 300 च्यावर कोरोना रुग्ण आहेत.त्यात सर्वाधिक नंदूरबार तालुक्यात 200 च्या वर कोरोना रुग्ण आहेत.दरम्यान आज जिल्ह्यात 7 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.
नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








