नंदुरबार l प्रतिनिधी
नोकरीसाठी जात असल्याचे सांगत चौपाळे ता. नंदुरबार येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील युवक मृगराज संतोष माळी (24)हा दि. 10 जानेवारी रोजी घरातून सकाळी सव्वा सात वाजता धुळे येथे नोकरीला जातो म्हणून घरच्यांना सांगून निघाला. काही कालावधीनंतर मृगराज याच्या भाऊ स्वप्निल माळी याने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद होता. मोबाइल बंद असल्यामुळे परिवारातील सदस्यांची चिंता वाढली. त्यांनी मृगराजच्या सर्वत्र शोध घेण्याच्या प्रयत्न केला. परंतु,तो कुठेही मिळून आलेला नाही.
याबाबत स्वप्नील माळी चौपाळे ता. नंदुरबार यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या खबर नुसार मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता मृगराज माळी हा धुळे येथे आयकर विभागात करार तत्वावर नौकरीला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.








