तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,माध्यमिक शिक्षण विभाग नंदुरबार व मुख्याध्यापकसंघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या महिला शिक्षकांचे 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान ‘स्री शक्ती जागर अभियान’ अंतर्गत वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण घेण्यात आले.या प्रशिक्षण शिबिरात शिक्षकीनी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे घेतले.
शहादा व धडगाव तालुक्यांतील शिक्षिकांचे विकास हायस्कुलमध्ये प्रशिक्षण शिबिर शहादा येथे संपन्न झाले.यात एकूण 78 महिला शिक्षिका व शिक्षक सहभागी झाले होते. तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयात तळोदा व अक्कलकुवा यांचे संयुक्तरित्या शिबिर सपन्न झाले यात ४२ शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले.नंदुरबार तालुक्यातील शिक्षक-शिक्षिकांचे कमला नेहरू कन्या विद्यालयात झाले.त्यात 52 शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले.नवापूर तालुक्यातील शिक्षक-शिक्षिकांचे विसरवाडी येथिल दादासाहेब माणिकराव गावित माध्यमिक विद्यालय येथे पार पडले.त्यात 46 शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले. या वैज्ञानिक जाणिवा शिबीरात वैज्ञानिक दृष्टिकोन , मन मनाचे आजार,स्त्रीया व अंधश्रद्धा,गटचर्चा व प्रश्नोत्तरे,चमत्कार व त्यामागील वैज्ञानिक कारणे,आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार येथे मन मनाचे आजार या विषयावर वसंत वळवी यांनी मांडणी केली. स्त्रीया आणि अंधश्रद्धा या बद्दल डॉ वृषाली यांनी मांडणी केली, जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार आणि बुवाबाजी या विषयाची मांडणी किर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी यांनी केली. शहादा येथे आज जादूटोणाविरोधी कायदा हंसराज महाले यांनी स्पष्ट करून सांगितला.डाकीण प्रश्न व तिचे स्वरूप याबद्दल विनायक सावळे माहिती दिली तसेच स्त्रिया आणि त्यांच्या अंधश्रद्धा या विषयावर डॉ अलका कुलकर्णी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. चमत्कार सादरीकरण व बुवाबाजी याबद्दलची मांडणी रवींद्र पाटील ,सुवर्णा ताई जगताप, प्रदीप केदारे यांनी विविध चमत्कार सादर करून त्यामागचे विज्ञान व हातचलाखी स्पष्ट करून सांगितले.

तळोदा येथे मन, मनाचे आजार या विषयावर मुकेश कापुरे यांनी मांडणी केली. वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रा प्रशांत बोबडे यांनी विषयाची मांडणी केली तर जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार-बुवाबाजी या विषयांवर हंसराज महाले व अमोल पाटोळे यांनी मार्गदर्शन केले. तळोदा येथे कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी यांचे शिबिर यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष निमेश सूर्यवंशी,सचिव अजित टवाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य उषा वसावे,प्रा निलेश गायकवाड उपस्थित होते.
विसरवाडी या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर किर्तीवर्धन तायडे यांनी तर मन व मनाचे आजार या विषयावर वसंत वळवी यांनी मार्गदर्शन केले.जादूटोणा विरोधी कायदा बलदेव वसईकर यांनी मांडला, स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावर स्थानिक स्त्रीरोगतज्ज्ञ डाँ. कविता सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.अंनिसचे स्थानिक कार्यकर्ते प्रा बी.व्ही.गावित यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा समारोप झाला.
शिबिराचे आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम,जिल्हा उपाध्यक्ष महा.अंनिस सी डी महाजन,डॉ डी बी शेंडे आर.बी.पाटील, मुकेश पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी,महेंद्र फटकाळ,उषा पेंढारकर , जयदेव पाटील,सुधाकर सोनार,टी.जी.मगरे , विश्वनाथ चौधरी आदींनी मार्गदर्शन केले.








