नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाटात कोंबड्यांनी भरलेला ट्रक ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर पलटी झाला.या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाले असून ट्रक आणि कोंबड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंबड्यांनी भरलेला ट्रक सुरत शहराच्याच्या दिशेने निघाला होता नवापुर तालुक्यातील चरणमाळ घाट कोंबड्यांनी भरलेला ट्रक (क्र. डी.जे.05, बी.वाय. 6115 ) तीव्र वळण रस्त्यावर आला असता ट्रक चालकाने ट्रक चा वेळ कमी करण्यासाठी ब्रेक दाबला मात्र ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे सदर ट्रक वरील नियंत्रण सुटून तो रस्त्यावर असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला या अपघातात ट्रक चालक हैदर अली मोहम्मद अली नीलगर ( वय 39) रा. अहमदाबाद हा किरकोळ जखमी झाला असून या अपघातात ट्रक आणि कोंबड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.








