तळोदा l राहुल शिवदे
तळोदा व परिसरात नायलॉन मांज्याची सर्रास विक्री या मथळ्याखाली पब्लिक मिररने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तळोदा पोलीस ठाणे यांनी दखल घेत शहरातील पतंग विक्रेते यांचाकड़े जाऊन दुकांनाची तपासणी केली असून नायलॉन मांजा विक्री करतांना आढल्यास कारवाई करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी कालपर्यंत विक्री होणारा नायलॉन मांजा नेमका गेला कुठे हा संशोधनाचा भाग आहे.
तळोदा व परिसरात नायलॉन मांज्याची सर्रास विक्री या मथळ्याखाली पब्लिक मिररने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तळोदा पोलीस ठाणे यांनी दखल घेत शहरातील पतंग विक्रेते यांचाकड़े जाऊन दुकांनाची तपासणी केली यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश केदार,उपनिरीक्षक बागुल,पो कॉंस्टेबल अजय पवार,आदी कर्मचारी यांनी तपासणी केली.मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही.संक्रांत च्या दिवशी पतंग उडवण्याचा मोह तरुणांना आवरता येत नाही.यातच पशु पक्ष्या पासून मानव जातीस घातक ठरलेल्या नायलॉन मंज्याचा सरार्स वापर केला जात असतो.या मांज्या अनेक पक्ष्याना आपला जीव ही गमवावा लागला आहे.दरवर्षी संक्रांत ला पतंग बाजीला उधान येत असते.संक्रांत ला पंधरवाड़ा शिल्लक असून ही आकाशात मोठ्या प्रमाणात पतंग उड़तांना दिसून येत आहे.यात आपली पतंग लवकर कापली जाऊं नये यासाठी नायलॉन मांज्याचा वापर केला जात असतो.शहरात विविध भागात पतंग विक्री ची दुकाने सजली आहेत. प्रशासनाने नायलॉन मांज्यावर बंदी घातली असतांना त्याची अंमलबजावणी होत नाही.कमी किमत आणि टिकाऊ या मुळे या मांज्या कड़े तरुण चा कल असतो. परंतु तालुका पोलीस विभागाने कड़क पाऊले उचलली असून नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एका दुकानदाराला नोटीस देण्यात आली आहे. काल तळोदा शहरात सायंकाळ पर्यंत सर्रास विक्री होणारा नायलॉन मांजा आज दुकानातून गायब झाला याबाबत पर्यावरणप्रेमीमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.








