नंदुरबार l प्रतिनिधी:-
नंदुरबार शहर पोलिसांनी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शासनाने वापर व विक्रीस प्रतिबंध घातलेला नायलॉन मांजा विक्री करतांना एकास पकडुन 3 हजार 100 रुपयांचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे आहे.मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही पहिली कारवाई केली असून नॉयलॉन मांजा विक्री करणार्यांवर पोलिस नजर ठेवुन आहेत.
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यासाठी अनेकांकडून नॉयलान मांजाची विक्री व वापर होतो.परंतु नॉयलान मांजा नागरीकांसह पशुपक्षींच्या जिवितासाठी धोकेदायक असल्याने जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करुन नॉयलान मांजा विक्री व वापरास देखील प्रतिबंध केल्याचे आदेश जारी केले आहे.नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त माहिती मिळाली की,नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात एक इसम नॉयलान मांजा विक्री करीत आहे.त्या माहितीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने त्याठिकाणी जावुन पाहणी केली असता जळका बाजार परिसरातील शिवाजी चौकात एका चहाच्या दुकानालगत एक इसम हातात प्लास्टीकची थैली घेवुन प्रतिबंदी असलेला नॉयलान मांजा विक्री करतांना मिळून आला.त्यास पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने रविंद्र ईश्वर भिल रा.श्रॉफ हायस्कूल जवळील टेकडीवर, नंदुरबार असे नाव सांगितले.त्याच्याकडून 1 हजार 400 रुपये किंमतीचे मोनोकिट नॉयलानमांजा प्लाटीक कोटींग असलेला दोन मोठे नग प्रत्येकी 700 रुपये किंमतीप्रमाणे,400 रुपये किंमतीचा एक नग मोनोगोल्ड नॉयलान मांजा,800 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा असलेले 4 लहान नग प्रत्येकी 200 रुपये किंमतीचे,300 रुपये किंमतीचा एक नग मोनो किट फिगटेर नॉयलान मांजा प्लास्टीक कोटींग असलेला व 200 रुपये किंमतीची एक लागडी चक्री सुरती मांजा नाव असलेला नॉयलान मांजा असा एकुण 3 हजार 100 रुपये किंमतीचा नॉयलान मांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोकॉ.शैलेंद्र दंगल माळी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार रविंद्र ईश्वर भिल रा.श्रॉफ हायस्कूलजवळील टेकडीवर नंदुरबार याच्याविरुध्द भादंवि कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते,असई. रविंद्र पवार,पोहकॉ. अतुल बिर्हाडे, पोना. नरेंद्र देवराज,पोना. स्वप्निल शिरसाठ, पोकॉ. शैलेंद्र माळी,पोकॉ. श्रीकांत पाटील,पोकॉ. विजय नागोडे,पोकॉ. राहुल पांढारकर,पोकॉ. विशाल मराठे यांच्या पथकाने केली.








