Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार आगाराच्या बसवर अज्ञाताने केली दगडफेक, बसच्या मागील काचा फोडून केले नुकसान

team by team
January 10, 2022
in क्राईम
0
नंदूरबार आगाराच्या बसवर अज्ञाताने केली दगडफेक, बसच्या मागील काचा फोडून केले नुकसान

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील बस आगारातून शिरपूरकडे आज दि.१० जानेवारी रोजी रवाना झालेली बस परतत असताना दोंडाईचाहून नंदुरबारकडे येत असतांना रामी फाट्यावर दुचाकीवर येत अज्ञात दोघांनी दगडफेक करुन बसच्या मागील काचा फोडून नुकसान केले आहे. यावेळी बसमध्ये वाहकासह २२ प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नंदुरबार बस आगारातील बसचालक किरण पवार हे बस (क्र.एम.एच. २० बीएल ३७६८) घेवून शिरपूरकडे रवाना झाले होते. शिरपूरहून परततांना दोंडाईचा येथे प्रवाशांना उतरवून व २२ प्रवाशांना घेवून बस नंदुरबारकडे येत होती. यावेळी नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील रामी फाट्याजवळ महादेव मंदिरापासून काही अंतरावर दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरुन येत मागून बसच्या काचांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. बसच्या काचा फुटल्यावर बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केली. किरण पवार यांनी बस थांबविली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, घटनास्थळी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दोंडाईचा पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला आहे. सदरची घटना सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसचालक किरण पवार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३३६, ४२७, ३४ प्रमाणे दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात आजपासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू, राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र, 72 तासा दरम्यानचे आरटीपीसीआर आवश्यक : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात सोमवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण, ६ जण झाले कोरोना मुक्त

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्ह्यात सोमवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण, ६ जण झाले कोरोना मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add