Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात आजपासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू, राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र, 72 तासा दरम्यानचे आरटीपीसीआर आवश्यक : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

team by team
January 10, 2022
in राज्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हयात सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री 11 वाजेनंतर सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल तसेच महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वा प्रवासाचे 72 तासा दरम्याचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे .असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख मनीषा खत्री यांनीवडीले असून शाळा , सलून , रेस्टॉरन्ट , कार्यालये , मॉल , जीम्स आदी विषयी दिन 10 जानेवारी 2021 म्हणजे आज पासून एका आदेशाद्वारे नवे निर्बंध लागू केले आहेत .
या आदेशात त्म्हटले आहे की ,महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वा प्रवासाचे 72 तासा दरम्याचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे . सदर बाब हवाई वाहतूक , रेल्वे वाहतूक , वाहतूकीला लागू असेल . रस्ते मार्गांनी प्रवास करणारे वाहनचालक / क्लीनर्स / इतर स्टाफ यांनीही सदर बाबींचे पूर्ण पालन करावे .सर्व शाळा आणि महाविद्यालय , कोचिंग क्लासेस हे दि. 15 फेब्रुवारी 2021 रोजीपर्यंत बंद राहतील . इयत्ता 10 वी व 12 चे शैक्षणिक क्रियाकरिता संबंधित शिक्षण बोर्डाचे वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाने आवश्यक कार्यवाही करावे . वर्गातील अध्यापना व्यतिरिक्त प्रशासकीय बाबी व कार्यवाही नियमितपणे शिक्षकांकडून करण्यात यावे . शिक्षण विभाग , तंत्र व उच्चशिक्षण विभाग , कौशल्य विकास विभाग , वैद्यकीय शिक्षण , महिला व बालविकास विभागांकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावे .याशिवाय सदर विभागांना इतर बाबींकरिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य यांचेकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असेल . जिल्हयात सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपावेतो जमाबंदी लागू करण्यात आल्याने सदर वेळेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या गटात फिरण्यास मनाई असेल . रात्री 11 वाजेनंतर सकाळी 5 वाजेपावेतो संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक उद्दिष्टे वगळता फिरण्यास मनाई असेल .कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखांचे लेखी परवानगीशिवाय कार्यायालयात प्रवेशास मनाई असेल . प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चेकरिता व्ही . सी . ची सुविधा कार्यान्वित करण्यात यावे . शासकीय बैठकांकरिता ऑनलाईन व्ही . सी . सुविधेचा वापर करण्यात यावा . कार्यालयातील वा बाहेरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता सदर बाब लागू असेल . कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम ची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे .सर्व शासकीय कार्यालयांध्ये कोविड अनुरुप पद्धती ( CAB Covid Appropriate Behaviour ) चे अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांनी करावी . सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स , सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम ची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे . शक्यतो कार्यालयीन वेळा 24 तास करण्यात येऊन कर्मचाऱ्यांचे ड्युटी कालावधीमध्ये तशाप्रकारचे आवश्यक बदल करण्यात यावे , ज्यात त्यांचे प्रवासाचे वेळाचे विचार करण्यात यावे तथापि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधित आवश्यक नियोजन करण्यात यावे . कोविड- 19 लसीकरणांचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे . तथापि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हावयाचे आहे.त्याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे . कार्यालयांध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे ( CAB ) अनुकरण योग्यरित्या होत असल्याची खातरजमा संबंधित कार्यालय व्यवस्थापनप्रमुख यांनी करावी . सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स , सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे . जलतरण , जिम्स , स्पा , पुढील आदेशापर्यंत बंद असतील . वेलनेस सेंटर्स आणि ब्युटीपार्लर सलून / केशकर्तनालये 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल . दुकांनामध्ये केसकर्तनाशिवाय इतर सर्व प्रकारचे कार्यांना मनाई असेल . दररोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत सदर दुकाने बंद असतील . मनोरंजनाची स्थळे जसे की , उद्याने , बाग – बगीचे / पार्क्स , किल्ले , पर्यटन / प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद असतील .शॉपींग मॉल्स , बाजार संकुले , रेस्टॉरेन्ट , उपहारगृहे , नाट्यगृह / चित्रपटगृहे इ . 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर मोल्सचे एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे . कोविड अनुरुप वर्तन / निर्देश / नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे . सदर ठिकाणी कोविड -19 रॅट चाचणी करिता बुथ उपलब्ध ठेवण्यात यावे . दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे . दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर दुकाने बंद असतील . पार्सल सुविधा / होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल .

बातमी शेअर करा
Previous Post

अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शेख अनिस यांचा वाढदिवस साजरा

Next Post

नंदूरबार आगाराच्या बसवर अज्ञाताने केली दगडफेक, बसच्या मागील काचा फोडून केले नुकसान

Next Post
नंदूरबार आगाराच्या बसवर अज्ञाताने केली दगडफेक, बसच्या मागील काचा फोडून केले नुकसान

नंदूरबार आगाराच्या बसवर अज्ञाताने केली दगडफेक, बसच्या मागील काचा फोडून केले नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add