नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकत 23 हजार 840 एवढी रोख रक्कम जप्त केली असून याप्रकरणी एका संशयीतावर धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि.10 जानेवारी रोजी धडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल भदाणे,पोलीस कॉन्स्टेबल दिपक वारूळे व पोलीस कॉन्स्टेबल राजेश्वर भूसलवड हे धडगाव शहरात पायी पेट्रोलिंग करत असतांना पोलीस उपनिरीक्षक धडगाव राहुल भदाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,धडगाव शहरात हनुमान मंदिराजवळ एक इसम गैरकायदा टाईम बाजार अंक सट्टा बाजाराचा अंक खेळवित आहे.अशी बातमी मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे यांनी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील,अपर पोलीस अधिक्षक विजय पवार व विभागीय पोलीस अधिकारी श्री.घुमरे,स्थानिक गुन्हे शाखा रविंद्र कळमकर यांना फोनद्वारे कळवले व त्यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यांनी आदेशीत केल्याने पोलीस कॉन्स्टेबल दिपक वारुळे यांनी रस्त्याने येणारे जाणारे दोन इसमांना बातमीची हकीकत सांगून पंच म्हणून सोबत येण्यास विनंती केली असता त्यांनी संमती दर्शवल्याने पोलीस रेड पार्टी व पंच यांनी पायी धडगाव शहरात हनुमान मंदिराजवळ नमूद बातमीपासून थोड्याच अंतरावर जाऊन खात्री केली असता तिथे एक इसम खाली बसून काही तरी लिहितांना दिसला त्या इसमाची चौकशी केली असता असे निदर्शनास आले की,तो सट्टाचे अंक लिहित होता.त्या इसमाला जागीच पकडले असता त्याचे व गाव विचारले असता त्याचे नाव सादिक खान इब्राहिम खान पठाण रा. मुस्लिम गल्ली धडगाव असे सांगितले त्याला पकडले असता त्याच्याकडे जुगाराचे साहित्य व 23 हजार 840 एवढी रोख रक्कम मिळाली.ह्या अनुषंगाने त्याचावर पो.कॉ. गणेश भामरे यांचा फिर्यादीवरून धडगाव पोलीस स्टेशन येथे जुगार प्रतिबंधक कायदा 12 अ नुसार या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








