नवापूर l प्रतिनिधी
विसरवाडी येथील लग्नसमारंभाहून नवापूरकडे शेतात जात असतांना भाजपाचे नवापूर तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य भरत माणिकराव गावित हे परिवारासह असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर ट्रॉलाने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यावेळी वाहनात असलेले गावित परिवारातील पाच जणांना किरकोळ इजा झाली आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
विसरवाडीकडून नवापूरकडे भरत गावित आपल्या परिवारासह परतत होते. यावेळी एका वळणावरुन जात असतांना त्यांच्या वाहनाला ट्रालाने धडक दिल्याने अपघात घडला. सदरच्या अपघातात भरत गावित यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, जिल्हा परिषद सदस्या संगीता गावित, चालकासह तीन सहकारी थोडक्यात बचावले. वाहनात चालक रवि गावित, भरत गावीत, मधील सीटवर संगीता गावित, रणजित गावित तर मागील सीटवर धुळीपाडाचे सरपंच उमेश गावित, सुखदेव गावित बसलेले होते. अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक गिरीश गावित, अजय गावित, प्रविण गावित यांच्यासह कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले व भरत गावित यांची विचारपूस केली. महामार्गाच्या गलथान कारभारावर नवापूर शहरात अपघात होत असल्याची नाराजी भरत गावित यांनी व्यक्त केली. भरधाव वेगाने ट्रक चालत असल्याने अपघात होत आहेत. भरत गावित यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. गाडीचे नुकसान झाले तरी गावित दाम्पत्याने माणुसकीच्या नात्याने चालकावर दया दाखवत त्या ट्रक चालकाला कोणीही मारू नये त्याला सुखरूप जाऊ द्या, असे सांगितले.








