नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील भूषा येथील नर्मदा नदीत मकरसंक्रांती निमित्ताने भाविक मोठ्या प्रमाणवर दर्शन घेण्यासाठी व आंघोळीसाठी येत असतात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये यासाठी जलपुजनाचा कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.या ठिकाणी भाविकांनी मकरसंक्रांतीला येवु नये असे आवाहन भूषा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
धडगाव तालुक्यातील भूषा येथील नर्मदा नदीत मकरसंक्रांती निमित्ताने स्थानिक नागरिक जलपूजन / स्थानासाठी व नवस फेडण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहत असतात . त्याचप्रमाणे तालुक्यातील रोषमाळ खु . या ग्रामपंचायती अंतर्गत चिंचखेडी अटटी , थुवानी व भरड येथील मोठया संख्येने नागरिक जलपूजन , स्थानासाठी व नवस फेडण्यासाठी उपस्थित राहतात . तरी सन २०१९ मध्ये मकरसक्रांती निमित्ताने नर्मदा नदीत नवस फेडण्यासाठी जाणार्या नागरीकांची बोट दुर्घटनाग्रस्थ होऊन ७ नागरीकांचा बोट दुर्घटनेमध्ये मृत्यु झाला होता . सदरहु बोट खाजगी व्यवसायका मार्फत चालविल्या जात असतात . यावर्षीही दि.१४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्ताने जलपुजन / स्थानासाठी व नवस फेडण्यासाठी धडगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने जनसमुदाय नर्मदा नदीकाठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे . करिता मागील घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याने नर्मदा नदी काठावर ग्रामपंचायती मार्फत निषिध्द क्षेत्र म्हणुन घोषित करून भाविकांना येण्यास भुसा ग्रामपंचायतीने बंदी घालण्यात आली असुन ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. जलपुजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने भाविकांनी मकरसंक्रांतीला येवु नये असे आवाहन भूषा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.








