नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात
“मासिक पाळी व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आरोग्य सेविका श्रीमती ए .आर. ओगले, परिचर शालिनी पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या प्राचार्य सौ. विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्रीमती ए.आर. ओगले व सौ. शालिनी पाटील यांनी मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आरोग्य संदर्भातील स्वच्छता, वापरावयाची साधने याबद्दल अतिशय सविस्तर माहिती दिली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांनीना सखोल माहिती सांगितली. तसेच विद्यालयातील सौ. बी. एल. पाटील यांनी सविस्तर माहिती सांगितली. त्यावर साहसी खेळ घेतला. सौ एस. पी. पाटील, व सौ सी .व्ही . पाटील यांनी मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सौ. एम.आर.पाटील यांनी माहिती सांगितली. विद्यालयाच्या प्राचार्य विद्या चव्हाण यांनी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर बंधू यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचलन सौ. व्ही. आर. पाटील यांनी केले. व आभार सौ. हर्षदा चव्हाण यांनी मानले.








