नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग (अपंग) विशिष्ट योजनेचा पाच टक्के रक्कम मिळावे या मागणीचे निवेदन सरपंच व ग्रामसेवक प्रहार जनशक्ती दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष यांनी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पाच वर्षापासून ग्रामपंचायतचे चक्कर मारत आहोत. तरी आमच्या निधीचा कोणीही विचार करीत नाही. तरी आमच्या दिव्यांग निधीसाठी प्रयत्न करीत आहोत. आमच्या योजनेची दखल कोणी घेत नाही. आमच्या दिव्यांगाचे निधी चे पैसे लवकरात लवकर मिळावे. नाहीतर आम्ही ग्रामपंचायती विरूध्द आंदोलन करू असा ईशारा प्रहार जनशक्ती दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष पंकज रमेश बच्छाव यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.