नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 6 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता मुंबई येथून नाशिक मार्गे मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण असली ता.धडगांव जि.नंदुरबार येथे मुक्काम.
शुक्रवार 7 जानेवारी 2022 रोजी असली येथे राखीव व मुक्काम. शनिवार 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता असली ता.धडगाव येथून नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता नंदुरबार येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ बिरसा मुंडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार )








