Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व थुंकल्यास 200 रुपयांचा दंड : जिल्हादंडाधिकारी : नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

team by team
January 6, 2022
in राज्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास तसेच थुंकणाऱ्यांविरुध्द 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. मात्र, हाच गुन्हा वारंवार केल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीं तसेच संस्था, आस्थापना विरुध्द 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) व महाराष्ट्र कोविड-19 नियम 2020 चे कलम 3 नुसार दंडात्मक तसेच फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भाग असून तेथील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन सामग्रीचा व इतर बाबी विचारात घेता या आदेशातील निर्बंध कायम ठेवून दंडाची रक्कम कमी करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये, तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास 200 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास 400 रुपये तर तिसऱ्यांदा आढळल्यास 500 रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गॅस एजन्सीला ऑनलाईन फसवणुक करीत घातला चार लाख २० हजार रुपयांचा गंडा, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Next Post

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add