नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएममध्ये एक पांढऱ्या रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला व चष्मा परिधान केलेल्या इसमाने एटीएम प्रवेश केला. एटीमएम मशिनचा खालचा दरवाजा तोडून त्याने चाव्यांच्या सहाय्याने उघडून इलेक्ट्रिक लॉक तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सुभाष रामदास कुवर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संशयित आतिष करणसिंग राजपूत याच्याविरोधात भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संदिप गोसावी करीत आहेत.








