नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील असलोद येथून दोघा अल्पवयीन युवकांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील असलोद येथील ऋषिकेश ईश्वर पवार (वय १५) व पवन रामकृष्ण पवार (वय १४) या दोघा अल्पवयीन युवकांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत ईश्वर विनायक पवार यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काळूराम चौरे करीत आहेत.








