Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
January 5, 2022
in राज्य
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त व्यापक उपक्रमांचे आयोजन करून मतदारांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. याबैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. मतदार यादीत मतदारांना आपले नाव शोधण्याबाबत मार्गदर्शन करावे.
मतदार जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषेत पोस्टर व बॅनर लावण्यात यावेत. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निंबध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, स्पर्धां आयोजित कराव्यात. या दिवशी मताधिकार, लोकशाही संबंधी व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन करावे. विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट तयार करावेत. दिव्यांग, तृतीयपंथी, तसेच 18 वर्षांवरील नवमतदारांना या दिवशी ई-एपिक कार्डचे वाटप करावेत. उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तीय अधिकारीचा सत्कार करावा.असे विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात यावेत.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.बागडे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतींनी गावातील महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय मतदान दिनाचे बॅनर, फ्लेक्स लावावेत. ग्रामस्थांमध्ये विशेषत: नवमतदारांमध्ये मताधिकार, निवडणूक लोकशाही याविषयी जनजागृती करावी. राष्ट्रीय मतदार दिवसाविषयी जनजागृती व्हावी म्हणून मताधिकार, लोकशाही याविषयावर रांगोळीचे रेखाटन करावे. ग्रामस्थांसमवेत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घ्यावी. ज्या मतदारांनी नियमितपणे मतदान केले आहे, अशा ज्येष्ठ मतदारांचा सत्कार करावा. हे सर्व कार्यक्रम ‘कोविड- 19’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनाचे व नियमांचे पालन करून करावे, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांची ७ जानेवारी पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश

Next Post

प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

Next Post
प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add