नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अवैध धंदे सर्रासपणे सुरु असून सदर अवैध बंद करण्यात यावे , अशी मागणीचे निवेदन नंदुरबार शहर भाजपा व नंदुरबार जिल्हा भाजपा मोर्चाने केली आहे .
याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे . त्यात म्हटले आहे की , नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे . शहादा , तळोदा , नंदुरबार , अक्कलकुवा व धडगाव , मोलगी , विसरवाडी , खांडबारा , चिंचपाडा , धानोरा , म्हसावद याठिकाणी सर्रासपणे अवैध धंदे सुरु असून सर्वसामान्यांची खुलेआम लुट केली जात आहे . तसेच सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा खेळ सुरु असून सट्टा खुलेआम सुरु आहे . जिल्ह्यातील बनावट ताडी विक्रीची फोफावली आहे . नजीकच्या गुजरात राज्यातून नंदुरबार जिल्ह्यातील गुटख्याची वाहतुक होवुन विक्रीही होत आहे . म्हणुन कायदा – सुव्यवस्थेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे , अशी मागणी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी , जिल्हा उपाध्यक्ष डॉ . सपना अग्रवाल , संगिता सोनवणे , युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील , शहराध्यक्ष नरेंद्र माळी , उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदाम चौधरी , भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय साठे , युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज राजपूत , शहर सरचिटणीस खुशाल चौधरी , महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा मनिषा निकम , युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश चौधरी , आदिवासी मोर्चाचे शहराध्यक्ष विजय नाईक , अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष समीर मन्सुरी , नगरसेवक आनंद माळी , युवा मोर्चा जिल्हा सचिव मयुर चौधरी यांनी निवेदनातून केली आहे .








