नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दि.३ जानेवारी रोजी तब्बल ७ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नंदूरबार जिल्हयात सलग तीन दिवस तीन तीन रुग्ण आढळले होते.आज दि. ३ जानेवारी रोजी नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्यात नंदूरबार शहरातील ३ तर शहादा तालुक्यात 4 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात ४ दिवसात १६ कोरोना रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








