म्हसावद l प्रतिनिधी
सर सैय्यद उर्दू स्कूल व प्राथमिक शाळा शहादा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रा. लियाकतअली सैय्यद होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे निरीक्षक प्रा. ज्ञानी कुलकर्णी होते.
याप्रसंगी प्राध्यापक लियाकतअली सैय्यद यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर माहिती दिली व त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख यांच्याकडे ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य होते. याचा उल्लेख त्यांनी केला. प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्वपूर्ण कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असे सांगितले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका हासमानी बिल्किस, वरिष्ठ शिक्षक अतहरअली सैय्यद, क्रीडाशिक्षक अब्दुल कय्यूम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वकार शेख आदी सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.








