म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सन्मित्र क्रीडा मंडळ आणि अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाज सुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवयित्री अशी चतुरस्र ओळख असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमीत्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे राजेंद्र माळी, रमाशंकर माळी,सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली.सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाचे कार्य व समाज सुधारक कार्याचा गौरव प्रा. ज्ञानी कुलकर्णी व राजेंद्र माळी यांनी केला. याप्रसंगी संचालक के. के. सोनार , शिवपाल जांगिड, पिनाकिन पटेल, बापू महाजन, विनोद माळी,व सदस्य आदी उपस्थित होते, उपस्थितांनी देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.








