Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन वर्षांनंतर शासनाने यंदा पुन्हा सुरू केले संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान

team by team
January 3, 2022
in आरोग्य
0
दोन वर्षांनंतर शासनाने यंदा पुन्हा सुरू केले  संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान

तळोदा l वार्ताहर

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खंडित पडलेले संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान दोन वर्षां नंतर शासनाने यंदा पासून पुन्हा सुरू केले असून  नंदुरबार येथील समितीने तळोदा तालुक्यातील सहभागी पाच गावांना भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली होती.

ग्रामीण भागातील खेड्यामध्ये स्वच्छता राखावी व गावाच्या विकासात जस्तीस जात गावकऱ्यांच्या सहभाग वाढावा यासाठी गेल्या वीस वर्षांपासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले आहे.साहजिकच या अभियानातून ग्रामीण खेड्यानी देखील स्वच्छतेची कास धरली होती.तथापि गेल्या दिड,दोन वर्षा पासून कोराना या जागतिक महामारीने धुमाकूळ घातल्याने आपसूकच राज्यशासनाने देखील त्याला ब्रेक दिला होता.मात्र कोरोनाची लाट ओसरली नंतर पुन्हा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.त्यानुसार नंदुरबार येथील तालुका स्तरीय संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश वळवी,ग्राम पंचायत विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे,स्वच्छता समन्वयक रितेश पाटील,सचिन करवे यांच्या समितीने शुक्रवारी तळोदा तालुक्यातील रांजणी, मोरवड,गणेश बुधावल,मोड व राणापूर या ग्राम पंचायतीना भेट देवून गावांमधील स्वच्छतेची पाहणी केली.या पाहणीत सदस्यांनी पाणी गुणवत्ता,सार्वजनिक स्वच्छता, गावातील शौचालय, त्यांचा वापर, सांड पाणी व्यवस्थापन,नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर आदी ठिकाणी भेट दिली.त्यानंतर सबंधित ग्रामपंचायतींची प्रशासकीय कामकाज,नावीन्यपूर्ण उपक्रम,पाणीपट्टी, घरपट्टी वसुली,शासकीय निधीच्या खर्च आदी बाबींची तपासणी केली.जवळपास सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यांचा सोबत तळोदा पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे हे देखील होते.दरम्यान या समितीचे स्वागत सबंधित ग्राम पंचायती चे ग्रामसेवक मधुकर कापूरे,एम एस शेख,हारसिंग पावरा,संदीप सिरसाले,वी जी बावा यांनी केले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे तस्करी प्रकरणी सागबारा पोलिसांनी केली अक्कलकुवा येथील कृषी विस्तार अधिकाऱ्यास अटक

Next Post

नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ

Next Post
नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ

नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे रेझिंग डे सप्ताहास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add