खेतिया | वार्ताहर
खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाने भरलेले ट्रॅक्टरचोरट्यांनी लांबविला खेतिया पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती काढली असता असता चोरट्यांनी चक्क नंदुरबार तालुक्यातील एका जिनिंग मध्ये विकला पोलीसांनी याप्रकरणी कापसासह टॅक्टर जप्त केले असुन याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मलगाव ता.शहादा येथील शेतकरी दिलीप आपसिंग पाडवी यांनी कापसाने भरलेला ट्रॅक्टर – ट्राली लिलावासाठी उभा केला होता. ट्रॅक्टर मालक व चालक सदर वाहन हे बाजार समितीत उभा करून दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री घरी झोपण्यासाठी निघून गेले त्या दरम्यान सदर ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने रात्री २ वाजेच्या सुमारास सुरू करून भरलेल्या कापसासह पोबारा केला. सकाळी ट्रॅक्टर मालक आल्यावर आपले ट्रॅक्टर जागेवर नाही असे समजताच त्यांनी खेतिया येथील बाजार समिती व खेतिया पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष सावळे यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली आणि जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती काढली असता सदर कापसाने भरलेला ट्रॅक्टर हा नंदुरबारचे दिशेने घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान त्वरित एक टीम (पथक) गठीत (तयार) केली आणि पोलिसांनी तपासाची गती मिळाली. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर नंदुरबार जवळील नारायण जिनिंग येथे कापूस विक्री होत असल्याचे तपासातून समजले आणि पोलिस त्वरित घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत आरोपीने कापूस विक्री करून ट्रॅक्टर ट्रॉली इतर ठिकाणी नेल्याचे समजले. त्या ठिकाणाहून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले व जिनिंग मध्ये विकलेला कापूसही पोलिसांनी ताब्यात घेतला. खेतिया पोलिसांनी २८ डिसेंबरच्या रात्री कृषी उत्पन्न बाजार समिती खेतिया येथे कापसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली चोरणार्या आरोपीला पकडले आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेतिया पोलिसांनी एक पथक तयार करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी दादाभाई बाळू पाटील रा.कार्ली ता.नंदुरबार याला पकडले. येथून कापूस भरलेली ट्रॉली घेऊन व नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा येथून दुसरा ट्रॅक्टर भाड्याने घेऊन आरोपींने नारायण कोटेक्स जिनिंग फॅक्टरी येथे जाऊन कापूस विकला होता. या विक्रीची माहिती मिळताच पोलीस पोहोचले व चोरीला गेलेला ट्रॅक्टर जप्त करून कापसाने भरलेली ट्रॉली जप्त करून खेतिया पोलीस ठाण्यात आणली. २५ डिसेंबरच्या रात्री चोरी झालेली मोटारसायकल ही पोलिसांनी आरोपींकडून चोरीची मोटार सायकलही जप्त केली. शनिवारी १ जानेवारी २०२२ रोजी बडवानी पोलीस अधीक्षक दीपक शुक्ला हे खेतिया येथे पोहोचल्यानंतरयांनी त्यांनी पोलीस पथकाच्या या यशाबद्दल १० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पोलीस विभागाच्या पथकाने १० लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे, तसेच आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकात खेतिया पोलीस निरीक्षक संतोष सावळे, पोलिस उपनिरीक्षक रितेश खत्री (सायबर शाखा), सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलाश चौहान, अनिल पाठक, हवालदार हेमंत मंडलोई, चालक लीला शंकर, सैनिक अशोक, कैलास यांचा समावेश होता. शेतकरी दिलीप आपसिंग पाडवी यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले व त्यांचे सत्कार व अभिनंदन केले तसेच बाजार समितीचे सचिव श्री.जामरे यांनीही पोलिस प्रशासनाचे आभार मानले.








