नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदभार पदाचा उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी हे आदेश काढले .
प्राथमिक शिक्षणाधिकारीपद गेल्या काही वर्षांपासून रिक्तच आहे . या पदावर नेहमीच प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे . गेल्या काही दिवसांपासून उपशिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी यांच्याकडे पदभार होता . आता त्यांच्याकडील पदभार हा उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे . याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी आदेश काढले . डॉ . पठाण हे गुरुवारी पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले .डॉ . पठाण हे गेल्या सहा वर्षांपासून नंदुरबार येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत . प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तीन महिन्यांपूर्वी त्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती . त्यानुसार त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत .








