म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रॉफ हायस्कूल नंदुरबार येथे बुद्धिबळ निवडस्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत एकूण 5 खेळी करून विजेते घोषित करण्यात आले. बक्षीस वितरण नंदुरबार नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश रघुवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले
पंच म्हणून प्राध्यापक सुभाष मोरावकरआणि संदीप साळुंखे यांनी भूमिका पार पाडली.या स्पर्धेत प्रत्येक गटात दोन मुले आणि दोन मुली निवडण्यात आले. निवड झालेले राज्यस्तरीय स्पर्धेत खेळतील.नाशिक ,मुंबई , पुणे,अमरावती ,नगर , जळगाव, सांगली कोल्हापूर ,नंदुरबार ,येथे दि.10 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत तेथे निवड झालेले विद्यार्थी खेळण्यास जातील विविध आठ गटात स्पर्धा झाल्या त्याच्या निकाल पुढीलप्रमाणे 8 वर्षाच्या गटात यामिनी शिंदे ,नारायणी मराठे, दक्षिल देवरे, देवांशू भामरे.
10 वर्षाच्या गटात ऋत्विक शिंदे, पार्श्व भंडारी, प्रीती सपकाळे ,वेदांत पाटील.
12 वर्षाच्या गटात, दुर्वेश मराठे, कृष्णा पाटील जानवी सपकाळे ,भाविषा पाटील.
14 वर्षाच्या गटात अमय सावळे ,उन्नत गौतम, भूमी परदेशी ,सेजन अग्रवाल.
16 वर्षाच्या गटात विनीत बागुल, भूमी भंडारी, रोशन राठोड, सिद्धी जैन.
18 वर्षाच्या गटात प्रियेश चितोडा सागर महाजन दिया सोनार ,हर्षा खैरनार.
20 वर्षाच्या गटात ऋषिकेश सोनार, रुचिता गोरे आसीम खाटीक, प्रणाली पटेल.
खुल्या गटात बोरसे वैभव, नितीन घोडके ,गणेश मराठे मयुर पाटील यांची निवड करण्यात आली.
रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिव अनिल शर्मा , सदस्य विजय बडगुजर, सुशील गवळी , जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रमुख श्रीकांत अग्निहोत्री, राहुल खेडकर ,अशिक वोरा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.








