नंदूरबार l प्रतिनिधी
आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली .या आयकर विभागाच्या छाप्यात संबंधित तीन जिल्ह्यातून 240 कोटींची अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे.मात्र चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.यामध्ये 6 कोटींच्या रोकडसह 5 कोटींचे मौल्यवान दागिने देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात भ्रष्टाचार आणि करचोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहे . आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत . उत्तर प्रदेशात एका अत्तर व्यावसायिकाकडे तब्बल 257 कोटींचं घबाड सापडल्याची घटना ताजी असताना , आता महाराष्ट्रात देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे . आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली आयकर विभागाच्या छाप्यात संबंधित तीन जिल्ह्यातून 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.यामध्ये 6 कोटींच्या रोकडसह 5 कोटींचे मौल्यवान दागिन्यांचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे . यात खरेदी विक्री करणारे व्यावसायिक , सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत . आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स , मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आयकर विभागाच्या धाड सत्रात मोठे घबाड सापडल्याची शहरात खमंग चर्चा आहे.








