नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बिसमिल्ला चौक भागातून जाणाऱ्या दुचाकीस्वारास अडवून त्यास मारहाण करीत त्याच्याकडून सुमारे ७० हजाराची रोकड जबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील बिसमिल्ला चौकातून किराणा दुकानदार नरेंद्र बुधा माळी जात होते. यावेळी रस्त्यात उभ्या असणाऱ्या समीर शेख, शहेबाज बेलदार, कालू पहेलवान उर्फ वसीमखान अजीजखान कुरेशी व साजीद कुरेशी या चौघांना रस्त्यातून बाजूला सरकण्यास सांगितले. याचा राग आल्याने नरेंद्र माळी हे त्यांच्या राहत्या घरातून मंगळ बाजारात दुचाकीने जात असतांना त्यांच्याकडे ७० हजार ५०० रुपयांची रोकड होती. यावेळी चौघांनी नरेंद्र माळी यांची दुचाकी अडवून लाकडी काठ्या व लोखंडी सळईने मारहाण करुन जबर दुखापत करीत शिवीगाळ केली. तसेच वाहनाचेही नुकसान केले. यादरम्यान कोणीतरी नरेंद्र माळी यांच्याकडील रक्कम हिसकावून नेली. याबाबत नरेंद्र माळी यांच्या फिर्यादीवरुन चौघा संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३२६, ३४१, ५०६, ४२७, ३४ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहेत.








